अभिनेत्री सारा अली खाननं मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सैफ अली खान आणि अमृता सिंगची लेक सारा अली खान नेहमीच चर्चेत असते.
२०१८ मध्ये तिनं केदारनाथ सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली.
सोशल मीडियावर ही अभिनेत्री खूप प्रचंड सक्रिय असते आणि आपल्या फॅशनेबल लुक्सनं चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी ती सोडत नाही.
केदारनाथ,सिम्बा,कुली नं.१, अतरंगीरे अशा काही चित्रपटांमध्येच तिनं भूमिका साकारल्या असल्या, तरी तिला चांगलं फॅनफॉलोईंग मिळालं आहे.
चाहत्यांनी तिला थेट स्वप्नसुंदरीचाच किताब बहाल केला आहे.
सारानं काही पोस्ट केलं, की चाहत्यांकडून तिला दाद मिळते.
मध्यंतरी पांढऱ्याशुभ्र सलवार-कमीजमधला तिचा फोटो ट्रेंड झाला तो स्वप्नसुंदरी या टॅगसह.
‘केदारनाथ’ चित्रपटात तिनं साकारलेली बिनधास्त युवती आणि ‘सिम्बा’तली ग्लॅमरगर्ल अशा दोन्ही भूमिका चाहत्यांना आवडून गेल्या.
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या या कन्येनं अल्पावधीच स्वतःची ओळख मिळविण्यासाठी सुरू केलेला प्रवास इतर स्टारकिड्सच्या तुलनेत आश्वासक म्हणावा असाच आहे.