Red Section Separator

घराला दरवाजेच नाहीत, चोरी करणारा होतो आंधळा... असे रहस्यमय असलेलं अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे एक गाव आहे.

Cream Section Separator

आज आम्ही तुम्हाला शनी शिंगणापूर येथील काही आश्चर्यकारक रहस्य सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हीही शॉक व्हाल.

शनिदेवाचे हे शनिशिंगणापूर नेवासा तालुक्यातील सोनईपासून चार किलोमीटर व अहमदनगर-औरंगाबाद राज्यमार्गापासून चार किलोमीटर (नगर-घोडेगाव फाट्यावरून पश्चिमेला ४० किमी.) आहे.

शनि शिंगणापूर हे शनिदेवांच्या चमत्कारांसाठी प्रसिद्ध गाव आहे. येथील घरांना दरवाजे आणि कुलुप लावले जात नाही.

आजपर्यंतच्या इतिहासात येथे कधीच चोरी झाली नाही. जर कोणी चोरीचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो असं म्हणतात.

शनिदेव रेखीव मूर्तिरूपात नाही तर केवळ एका लांब काळ्या खांबाच्या आकाराच्या दगडाच्या रुपात विराजमान आहेत. येथे कोणतंही मंदिर नाही. ना त्यावर छत्र आहे. शनिदेवांची स्वयंभू मूर्ती ऊन, वारा, पाऊस, थंडीचा सामना करते. त्यावर कोणतंही छत्र नाही.

शनिवारी येणाऱ्या अमावस्येदिवशी तसेच प्रत्येक शनिवारीसुद्धा येथे विशेष पुजा आणि अभिशेक होतात. शनिजयंती दिवशी ठिकठिकाणी रुद्राभिषेक केला जातो.

Red Section Separator

लोकांच्या मान्यतेनुसार एखादा व्यक्ती जेव्हा शनिदेवाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतो, तेव्हापासून दर्शन घेईपर्यंत मागे वळून पाहू नये, असं म्हटलं जाते. जर एखाद्याने मागे वळून पाहिले तर शनिदेवाच्या त्याच्यावर कृपा होत नाही, असं म्हटलं जाते.

Red Section Separator

वृक्ष असून छाया नाही, घर असून दरवाजा नाही व देव असून देवूळ नाही. गावात कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे डोळे जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.