2022 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी फारसे चांगले राहिले नाही.
या वर्षी अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
आज आपण अशा तीन कंपन्यांच्या शेअर्सची चर्चा करणार आहोत ज्यांच्या किमती या वर्षी 50 टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत.
ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स :2022 मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 102 रुपयांवरून 32 रुपयांपर्यंत घसरली. म्हणजेच या वर्षी शेअर्सचे भाव 68.76 रुपयांनी घसरले आहेत.
गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या शेअर्समध्ये 64 टक्क्यांची घसरण झाली आहे.
तन्ला प्लॅटफॉर्मच्या शेअर्स : या वर्षी कंपनीचे शेअर्स 58 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कंपनीच्या एका शेअरची किंमत 1839 रुपयांवरून 761 रुपयांवर आली आहे.
झेन्सार टेक्नॉलॉजी लिमिटेड : 2022 या वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 59.83 टक्क्यांची घसरण झाली आहे.
कंपनीच्या एका शेअरची किंमत 533 रुपयांवरून 214 रुपयांवर आली आहे.