फेडने व्याजदरात वाढ केल्यानंतर, गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात जोरदार विक्री झाली.
जागतिक मंदीच्या भीतीने अमेरिकन, युरोपियन आणि आशियाई बाजार तसेच भारतीय बाजारात जोरदार विक्री झाली.
कॉर्पोरेट विकास आणि चांगल्या दृष्टिकोनाच्या आधारावर, ब्रोकरेज हाऊस शेअरखानने पुढील 12 महिन्यांसाठी 5 शेअर्स मध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे.
या शेअर्समध्ये, गुंतवणूकदार सध्याच्या किमतीच्या पुढे वर्षभरात 41 टक्क्यांपर्यंत उत्कृष्ट परतावा मिळवू शकतात.
कोल इंडिया लि : प्रति शेअर लक्ष्य किंमत रु 280 आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 223 रुपये होती.
कोटक महिंद्रा बँक : प्रति शेअर लक्ष्य किंमत रु. 2250 आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 1,859 रुपये होती.
कोफोर्ज लि : प्रति शेअर लक्ष्य किंमत 4680 रुपये आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 3,324 रुपये होती.
ब्रोकरेज फर्म शेअरखानने सिप्लाच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत रु. 1225 आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 1,071 रुपये होती.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड : प्रति शेअर लक्ष्य किंमत रु. 1550 आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 1,274 रुपये होती.