Red Section Separator

हिवाळ्यात अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. घरगुती उपायांनी तो कमी होऊ शकतो.

Cream Section Separator

रोज थोडा वेळ कोवळ्या उन्हात बसल्यास रोगप्रतिकारशक्ती व ऊर्जा वाढते.

आलं, लसूण, दालचिनी, तुळस, मेथी, हळद, पाणी, मध, लिंबूरस यांचा चहा विशेष गुणकारी ठरतो.

आलं-लसणाचा चहा दिवसांतून दोनदा घेतल्यास सर्दी-खोकल्यात आराम पडतो.

सर्दी-खोकला कमी होण्यासाठी औषधं, घरगुती उपायांसोबतच पुरेसा आरामही गरजेचा आहे.

पुरेसा आराम केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी-खोकला लवकर बरा होण्यास मदत होते.

दिवसभरात पुरेसं आणि शक्यतो गरम पाणी पिणं आवश्यक. लिंबू-मध पाण्यात मिसळून पिणंदेखील फायदेशीर ठरतं.

सर्दी-खोकला झाल्यास काळी मिरी घालून चिकन सूप किंवा टोमॅटो सूप पिणं श्रेयस्कर ठरू शकतं.

घरगुती उपायांनी बरं न वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक.