Red Section Separator

हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीचा गायक केके कृष्णकुमार कुन्नथ यांचं मंगळवारी रात्री उशिरा कोलकाता इथल्या एका कार्यक्रमात हृदयविकाराने निधन झालं.

Cream Section Separator

अवघ्या 53व्या वर्षीय केके यांच्या मृत्यूमुळे संगीतविश्व आणि बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

केके या नावाने प्रसिद्ध असलेल्या कृष्ण कुमार यांनी आपल्या आवाजाच्या जादूने इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

23 ऑगस्ट 1968 रोजी राजधानी दिल्लीमध्ये त्यांच्या जन्म झाला होता.

केके यांनी त्यांचे वैयक्तीक आयुष्य जगमगाटी दुनियेपासून व प्रसिद्धीपासून कायम दूर ठेवले.

केके यांनी 1991 मध्ये आपली लहानपणीची खास मैत्रीण ज्योती लक्ष्मी कृष्णासोबत लग्न केले होते. तिच्याशी लग्न करण्यासाठी केकेने सेल्समनची नोकरी केली होती.

केकेची ज्योतीशी पहिली भेट सहावीत झाली होती. मला माझ्या मैत्रिणीशी लग्न करायचे होते मात्र माझ्याकडे पैसे नव्हते. जॉब नव्हता त्यामुळे मी सेल्समनची नोकरी करण्यास सुरुवात केली.

Red Section Separator

माझ्या सासू सासऱ्यांनी मला तुला जॉब असेल तरच मुलगी देणार असे सांगितल्याने , मी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यानुसार मला नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी माझे लग्न लावून दिले.

केके यांचा 1999 मध्ये पहिला संगीत अल्बम आला. त्यानंतर केके यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

1999 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठी केके न 'जोश ऑफ इंडिया' हे गाणं गायलं होतं. ते प्रचंड हिट झालं होतं.

केकेने दीर्घकाळ आपल्या आवाजाच्या जादूने बॉलिवूडवर राज्य केले.

Red Section Separator

संपूर्ण कारकिर्दीमध्ये केके यांनी जवळपास 25 हजारपेक्षाही जास्त गाणी गायली.

Red Section Separator

केके यांच्या अचानकपणे झालेल्या  मृत्यूने देशभरतील चाहत्यांना, संगीत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.