Red Section Separator

आज तंत्रज्ञानाच्या युगात बहुतांश जण सोशल मीडियावर सक्रिय असतात.

Cream Section Separator

आजकाल प्रत्येकजण आपली खासगी माहिती, फोटो... या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो.

अनेकदा हे करत असताना योग्य ती काळजी न घेतल्यास आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

सोशल मीडिया सुरक्षितपणे वापरण्यासाठी या टिप्स फॉलो करू शकता:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरल्यानंतर, आपल्या प्रोफाइलमधून लॉग आउट करण्याचे सुनिश्चित करा, जेणेकरून कोणीही आपले प्रोफाइल वापरू शकणार नाही.

तुमची कोणतीही माहिती सार्वजनिक करू नका. म्हणजेच, पब्लिक सर्च पासून तुमचे प्रोफाईल ब्लॉक करा.

तुमची सोशल मीडिया क्रेडेन्शियल्स म्हणजे युजरनेम आणि पासवर्ड इ. कोणाशीही शेअर करू नका.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी युजर्सच्या फ्रेंड रिक्वेस्ट कधीही Accept करू नका.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो, स्टेटस शेअर करण्यापूर्वी, प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घ्या.

तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर तुमच्या घराचा आणि ऑफिसचा पत्ता आणि लोकेशन कधीही शेअर करू नका.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाठवलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंक्स उघडू नका.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गोपनीयता सेटिंग्ज High level वर किंवा Restricted स्तरावर सेट करा.