सहलीचे नियोजन करत असताना, लोकांच्या मनात सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे किती खर्च येईल.
आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही फुकटात राहू शकता.
भारतात अशा अनेक धर्मशाळा आणि आश्रम आहेत जिथे तुम्हाला राहण्यासाठी अजिबात पैसे द्यावे लागत नाहीत.
चला तर मग जाणून घेऊया ही ठिकाणे जिथे तुम्ही मोफत राहू शकता.
ईशा फाउंडेशन- ईशा फाउंडेशन कोईम्बतूरपासून सुमारे 40 किमी अंतरावर आहे. हे सद्गुरूंचे धार्मिक केंद्र आहे,
मणिकरण साहिब गुरुद्वारा (हिमाचल प्रदेश) - जर तुम्ही हिमाचल प्रदेशला भेट देणार असाल तर तुम्ही मणिकरण साहिब गुरुद्वारामध्ये मोफत राहू शकता.
आनंदाश्रम (केरळ)- केरळच्या सुंदर टेकड्या आणि हिरवाईच्या मधोमध आनंदाश्रमात राहणे हा एक वेगळा अनुभव असू शकतो. या आश्रमात तुम्ही मोफत राहू शकता.
गीता भवन (ऋषिकेश)- पवित्र गंगा नदीच्या काठावर असलेल्या गीता भवनमध्ये प्रवासी मोफत राहू शकतात. सोबतच इथे जेवणही मोफत दिले जाते.
गोविंद घाट गुरुद्वारा (उत्तराखंड)- हा गुरुद्वारा उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीजवळ आहे. येथे येणारे पर्यटक, ट्रेकर्स आणि भाविक येथे मोफत राहू शकतात.
निंगमापा मठ (हिमाचल प्रदेश) - हा मठ रेवलसर तलावाजवळील हिमाचली शहरात रेवलसर येथे आहे. या सुंदर मठात राहण्यासाठी एका दिवसाचे भाडे 200 ते 300 रुपये आहे.
तिबेटीयन बौद्ध मठ सारनाथ- उत्तर प्रदेशात असलेल्या या ऐतिहासिक मठात एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे फक्त 50 रुपये आहे.