केवळ प्रमाणपत्र घेतल्याने किंवा कोर्स केल्याने ब्युटी पार्लर हा व्यवसाय चालू करता येईल असे नाही.
मुळात, कुठलीही नवीन गोष्ट चालू करणे सुरुवातीला कठीण असते, पण योग्य तयारी आणि नियोजन केल्यास आपण सहजरित्या ती करू शकतो.
सलूनचा बिझनेस योग्य प्रकारे चालविण्यासाठी पुढील गोष्टी विचारात घ्या,
व्यावसायिक दृष्टीकोन जोपासणे - सलून म्हणजे एक ऑफिसच आहे असं समजा. ध्येय ठरवा आणि ते ध्येय गाठण्यासाठीचे नियोजन करा.
सलूनचे ठिकाण- योग्य जागा मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुमचे सलून ठळकपणे दिसायला हवे. यासाठी रंगीत फलकांचा वापर करा.
मार्केटिंग / विपणन - मार्केटिंग / विपणन हा खर्च नसून गुंतवणूक असते. तुमचा गूगल आणि सोशल मीडियावर वावर हवा.
कर्मचारी व्यवस्थापन - कर्मचारी हा व्यवसायाचा आत्मा असतो. त्यांना सदैव आनंदी आणि प्रोत्साहित ठेवा.
भांडवल व्यवस्थापन - तुम्हा सर्वाना माहिती आहे की भांडवल म्हणजे पैसे. किती सेवा देणे चालू आहे आणि साधनसामुग्री किती लागत आहे ह्यावर लक्ष ठेवा.
आर्थिक व्यवस्थापन - सर्व यशस्वी सलून व्यावसायिकांचे योग्य आर्थिक व्यवस्थापन असते. ते तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण मिळवून देते आणि तुम्ही किती नफा मिळवू शकता तेही दाखवते