Red Section Separator

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या भन्सालींच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा दीपिका आणि रणवीर यांनी स्क्रीन शेअर केली होती.

Cream Section Separator

याच चित्रपटादरम्यान त्या दोघांमध्ये जवळीक वाढायला सुरुवात झाली. या चित्रपटात अनेक रोमँटिक सीन पाहायला मिळाले.

Red Section Separator

विशेष म्हणजे या चित्रपटातील एका सीनमध्ये ते दोघेही इतके मग्न झाले होते की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही दोघे थांबले नव्हते.

नुकतंच रणवीर सिंहला एका मुलाखतीदरम्यान याबाबत विचारणा करण्यात आली.

Red Section Separator

त्यावर तो म्हणाला, “दीपिका आणि मी त्याक्षणी एकमेकांमध्ये इतके गुंतलो होतो की आमच्या खोलीत बाहेरुन दगड आल्याचे आम्हाला समजले नाही.

अनेकदा असे घडते. दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर तुम्हाला लगेचच त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही.”

“मला अजूनही रामलीलाच्या सेटवरील लिपलॉकचा एक खास प्रसंग अजूनही आठवतो. त्या सीनमध्ये खूप काही घडले होते. आम्ही दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो.

Red Section Separator

भन्साळींच्या चित्रपटात त्यावेळी घडलेला तो सीन अगदी खरा होता. त्यात काहीही खास इफेक्ट वापरण्यात आलेले नव्हते.” असे तो म्हणाला.