Red Section Separator

टिक टॉक स्टार,'बिग बॉस' फेम अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूने एकच खळबळ माजली आहे.

Cream Section Separator

दरम्यान सोनाली नेमकी कोण होती, कुठे राहात होती आणि तिची संपत्ती किती होती याबाबत अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत.

सोनाली फोगट ही मूळची हरियाणाची होती. तिचा जन्म हिसारमध्ये झाला होता.

ती हिसारमधील एका अलिशान घरात आपल्या मुलीसोबत राहात होती. याशिवाय नोएडामध्येसुद्धा तिचा फ्लॅट आहे.

सोनालीजवळ महिंद्रा एक्सयूव्ही कारही होती. ती आपल्या एका प्रोजेक्ट्ससाठी २० ते २५ लाख रुपये मानधन घेत होती.

इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी तिने ८० हजार रुपये घेतले होते.

सोनाली फोगट कोट्यावधींची मालकीण होती. मीडिया रिपोर्टनुसार तिच्याजवळ तब्बल अडीच कोटींची संपत्ती होती.

२०१९ मध्ये सोनालीने निवडणुकीचा अर्ज करताना आपल्याकडे २५ लाख ६१ हजारांची स्थिर आणि २ कोटी ४८ लाख ५० हजारांची अस्थिर संपत्ती असल्याचं सांगितलं होतं.

यापूर्वी सोनालीच्या पतीचादेखील संशयास्पद मृत्यू झाला होता. आता या दोघांच्या मागे त्यांची १५ वर्षाची मुलगी यशोधरा एकटी झाली आहे.