Red Section Separator

खरीप हंगाम प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होईल.

Cream Section Separator

रब्बी हंगामात संपूर्ण भारत वर्षात शेतकरी बांधव गहू या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात.

गव्हाची लागवड ही साधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत केली जाते.

गव्हाच्या शेतीतून निश्चितच शेतकरी बांधवांना चांगली कमाई होऊ शकते.

मात्र यासाठी शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित आणि प्रगत वाणांची पेरणी करणे अतिशय आवश्यक राहणार आहे.

जाणून घेऊया भारतात उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हाच्या काही प्रमुख जाती.

लोक-1 (लोकवन) :- पेरणी केल्यापासून अवघ्या शंभर दिवसात या जातीच्या गव्हापासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते.

या शंभर दिवसात तयार होणाऱ्या या जातीपासून शेतकरी बांधवांना 40-45 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देते.

HD-3086 (पुसा गौतमी) :- जाणकार लोकांच्या मते या जातीच्या गव्हात 12.5% पर्यंत प्रथिने आढळतात. यातून शेतकरी 130 दिवसांत उत्पादन घेऊ शकतात. नि

HI-1620 (पुसा गहू 1620) :- ही जात 125 ते 140 दिवसांत काढणीसाठी तयार होते तसेच या जातीच्या गव्हापासून उत्कृष्ट चपात्या बनवल्या जातात.