हाडे मजबूत करण्यासाठी, आपल्याला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते.
तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आणि रोजच्या खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करावे लागतील.
अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतील ते आपण जाणून घेऊ.
गूळ: हाडांसाठी गूळ फायदेशीर आहे, कारण गुळामध्ये लोह आणि कॅल्शियम दोन्ही आढळतात.
दूध : दुधामध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे आढळतात, परंतु त्यामध्ये असलेले कॅल्शियम आपल्या हाडांना फायदेशीर ठरते.
अंडी: जे शाकाहारी नाहीत त्यांच्यासाठी अंडी हा उत्तम पर्याय आहे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त, त्यात प्रथिने देखील मुबलक प्रमाणात आढळतात.
ड्राय फ्रूट्स: यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, काही ड्रायफ्रूट्समध्ये व्हिटॅमिन डी देखील असते जे हाडांसाठी सर्व प्रकारे फायदेशीर असते.
बीन्स : त्याची भाजी तुम्ही खाल्ली असेलच, यातून आपल्या हाडांना अप्रतिम ताकद मिळते. बीन्स हे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, जस्त आणि लोह यासारख्या महत्त्वपूर्ण पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे.