Red Section Separator

सर्वसाधारणपणे पिवळी साल असलेली केली आजवर आपण पहिले असतील. मात्र चक्क एका शेतकऱ्याने लाल केळीची शेती पिकवली आहे.

Cream Section Separator

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका शेतकऱ्याने याच लाल केळीची शेती करत अवघ्या 60 झाडातून वर्षाला 2 लाखांचे उत्पन काढले आहे.

कन्नड तालुक्यातील अजय जाधव या प्रगतीशील शेतकऱ्याने अडीच गुंठ्यात 500 केळीची झाडे लावली आहे. यात 60 झाडं लाल केळीची आहे.

10 वर्षांपूर्वी त्यांनी ही झाडे लावली होती. एका झाडाला सरासरी 15 किलोचा घड लागतो आणि ही केळ 300 रुपये प्रतीकिलो विकली जाते.

जाधव यांना लाल केळीच्या 60 झाडातून सरासरी वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांचे होते. केली खरेदीसाठी जाधव यांच्याकडे आधीपासूनच ग्राहका बुकिंग करत असतात.

लाल केळी नियमित खाल्ल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यासाठी सुद्धा मदत होते.

लाल केळी डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, त्यात पोटॅशिअम असल्याने हाडे बळकट होतात.

Red Section Separator

लाल केळी खाल्ल्याने हेमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो आणि त्यात ट्रायटोफन असल्याने मन शांत राहते.

Red Section Separator

लाल केळीचे अनेक फायदे आहेत. सोबतच अनेक आजारांवर लाल केळी खाल्ल्याने मात करू शकतो.