Red Section Separator
इंडियन मोटरसायकल्सने जागतिक बाजारात 2023 इंडियन FTR स्टेल्थ ग्रे स्पेशल एडिशन सादर केले आहे.
Cream Section Separator
या दुचाकीमध्ये 1203cc लिक्विड-कूल्ड व्ही-ट्विन इंजिन आहे.
हे इंजिन 121 bhp पॉवर आणि 120 Nm टॉर्क जनरेट करते.
या बाईकमध्ये अमेरिकन बनावटीचे सर्वात पॉवरफुल टू-सिलेंडर मिल असल्याचे सांगितले जाते.
चेन फायनल ड्राइव्हसह 6-स्पीड गिअरबॉक्स स्लिप आणि असिस्ट क्लचशी जोडलेला आहे.
विशेष बाब म्हणजे इंजिनची उष्णता कमी करण्यासाठी मोटरसायकल उभी असताना सिलिंडर आपोआप बंद होते.
याबाईकमध्ये अक्रापोविक एक्झॉस्ट, कॉर्नरिंग ABS, तीन राइडिंग मोड आणि प्रोटेपरचा फ्लॅट ट्रॅकर हँडलबार समाविष्ट आहे.
यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 4.3-इंच फुल-कलर टच-सेन्सिटिव्ह TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते.
ग्राहकांना यात 19-इंच फ्रंट व्हीलवर ट्विन फोर-पिस्टन कॅलिपर आणि 17-इंच मागील चाकावर सिंगल टू-पिस्टन कॅलिपर मिळेल.
या बाईकमध्ये तीन रायडिंग मोड उपलब्ध आहेत. या बाईकचे वजन 236 किलो असून यात 13 लिटरची इंधन टाकी मिळेल.