Red Section Separator

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

Cream Section Separator

अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेल्या हा सिनेमा देशातील तीन राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

'सम्राट पृथ्वीराज' उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.

आता मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. तर यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे.

राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार राजा पृथ्वीराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

सिनेमात मानुषी छिल्लर संयोगिताच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Red Section Separator

या चित्रपटात सोनू सूद, संजय दत्त, आशुतोष राणा, मानव विज, साक्षी तन्वर, ललित तिवारी हे देखील महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.

Red Section Separator

सम्राट पृथ्वीराज चित्रपट तीन राज्यात टॅक्स फ्री झाला असल्याने सिनेमाचे मेकर्स आनंदी असल्याचे दिसत आहे.