Red Section Separator
आई आणि वडील हे पालक म्हणून समान जबाबदारी पार पाडतात.
Cream Section Separator
पालकत्वाची दोघांनीही समान जबाबदारी उचलणे, ही सध्या काळाची गरजही आहे.
आई आणि वडील दोघेही काम करत असल्याने, ही गरज निर्माण झाली आहे.
यामुळे ऑफिस आणि घरकाम या दोन्ही गोष्टी सांभाळण्याचा तणाव कमी होतो आणि जबाबदारी समसमान वाटली जाते.
ज्या घरात आई आणि वडील दोघे मिळून काम करतात, त्या घरातील मुलांना आपोआपच टीमवर्क म्हणजे काय, हे समजत जाते.
समान पालकत्वाच्या संकल्पनेमुळे दोघांनाही मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते.
समान पालकत्वामुळे एक पालक जर बिझी असेल, तर दुसरा मुलांसाठी उपलब्ध असतो.
दोघांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात आणि त्यानुसार काम करावं, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे मुलांना आपोआपच टीम वर्कची ओळख होते.