चुकीच्या जीवनशैलीमुळेही दात पिवळे होण्याचे प्रमाण वाढते. असे काही पदार्थ आहेत ज्यांचा आपल्या दातांवर खूप वाईट परिणाम होतो.
त्यामुळे दात पिवळे पडतात. चला जाणून घेऊया की कोणते पदार्थ आपण जास्त खाणे टाळले पाहिजेत.
जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफी प्यायल्याने दातांचे नुकसान होते. ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.
जास्त चहा प्यायल्याने दातांची चमक निघून जाते. चहाऐवजी तुम्ही ग्रीन टी वापरू शकता.
धूम्रपान आणि तंबाखू चघळल्याने दातांवर डाग पडू शकतात. यामुळे तंबाखू खाणे टाळाच.
जर तुम्हाला रेड वाईन प्यायला आवडत असेल तर मर्यादित प्रमाणात सेवन करा.