Red Section Separator

कलर्स टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय रियलिटी शो ‘बिग बॉस 15’ची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Cream Section Separator

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानासोबत तेजस्विनी मोठय़ा पडद्यावर रोमान्स करताना दिसून येऊ शकते.

तेजस्वी ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाची मुख्य नायिका असणार आहे. याकरता तिने ऑडिशन दिली असून निर्मात्यांसोबत तिची बोलणी सुरू आहे.

तेजस्वीने दिग्दर्शक राज शांडिल्य यांचा चित्रपट ‘ड्रीम गर्ल’च्या सीक्वेलसाठी ऑडिशन दिली आहे.

पहिल्या चित्रपटाप्रमाणेच सीक्वेलमध्ये आयुष्मान खुराना दिसून येणार आहे. पहिल्या चित्रपटात नुसरत भरुचा, अनू कपूर यासारखे कलाकार होते.

तेजस्वीने यापूर्वी एकता कपूरचा ‘रागिनी एमएमएस’च्या पुढील प्रोजेक्टसाठीचा प्रस्ताव नाकारला होता.

सध्या ती ड्रीम गर्ल 2 चित्रपटासाठी प्रयत्नशील आहे. या चित्रपटाद्वारे तिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होऊ शकते.

Red Section Separator

या चित्रपटाचे लवकरच चित्रिकरण सुरू होण्याची शक्यता आहे.