एमजी मोटर इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एमजी सर्व्हिस ऑन व्हील्स नावाचा डोरस्टेप रिपेयर आणि मेंटेनेंस कार्यक्रम सुरू केला आहे.
कंपनीचा हा उपक्रम ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी सुरु केला आहे.
कंपनीने सध्या सर्व्हिस ऑन व्हील्स प्रोग्रामचा हा पायलट प्रोग्राम राजकोट, गुजरातमध्ये सुरू केला आहे, परंतु तो लवकरच देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचेल.
ही सेवा ब्रेकडाउन, इमरजेंसच्या प्रसंगी मदत करण्याव्यतिरिक्त कार सेवा देखील देईल.
यामध्ये वर्कशॉपमध्ये सर्व प्रकारच्या सेवा दिल्या जातील. यामध्ये प्रशिक्षित आणि सर्टिफाइड टेक्निशियनचा समावेश असेल.
यामुळे कंपनीचे सेवा नेटवर्क मजबूत होईल आणि बाजारात कंपनीची पोहोच वाढेल.
एमजी सर्व्हिस ऑन व्हील्स ही मोबाइल वर्कशॉप म्हणून काम करेल
जी वाहनांच्या मेंटेनेंससाठी सर्व स्पेयर पार्ट्स आणि इतर आवश्यक गोष्टींनी सुसज्ज असेल.
कार्यक्रम एका साध्या बुकिंग सिस्टमद्वारे नियंत्रित केला जाईल. यामुळे ग्राहकांना कंपनीशी कनेक्ट होण्यास आणि त्यांच्या सोयीनुसार कारच्या मेंटेनेंसचे शेड्यूल तयार करण्यास मदत होईल.