Red Section Separator

इंधनाच्या किमती वाढल्यापासून अनेकजण इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देतात.

Cream Section Separator

त्यामुळे इलेक्ट्रिक कार तयार करणाऱ्या कंपन्या कमी बजेटमध्ये चांगली कार देण्याचा प्रयत्न करतात.

अशातच टाटाने सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे.

या कारमध्ये (Tata Tiago EV) ग्राहकांना 300KM पेक्षा जास्त रेंज मिळणार आहे.

या कारची किंमत 8 लाख 50 हजार पासून ते 11 लाख 80 हजार रुपये इतकी आहे.

Tata Tiago EV ला दोन बॅटरी (Tata Tiago EV Battery) पॅकचा पर्याय मिळेल

24 kWh आणि 19.2 kWh. 24 kWh बॅटरी पॅक 315 किमीची रेंज देईल

19.2 kWh बॅटरी पॅक 250 किमीची रेंज देईल.

हॅचबॅकमध्ये चार चार्जिंग पर्याय देण्यात आले आहेत. हे 15A सॉकेट, 3.3 kW AC चार्जर, 7.2 kW AC होम चार्जर आणि DC फास्ट चार्जरने चार्ज केले जाऊ शकते.

7.2kW AC चार्जरसह बॅटरी 3 तास 36 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते.

त्याच वेळी, DC फास्ट चार्जरसह, बॅटरी फक्त 57 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते.