Red Section Separator

अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिला परिचयाची गरज नाही. इंडस्ट्रीत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Cream Section Separator

जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून ती सर्वांच्या मनात घर करून आहे.

मात्र, तिचा फॅशन सेन्सही चर्चेत आहे. तिच्याकडे बॅग्सचा अप्रतिम संग्रह आहे.

जान्हवी कपूरला सुंदर बॅगची आवड आहे. तिच्याकडे असलेल्या बॅग या लाखो रुपये किंमतीच्या आहेत. .

जान्हवी कपूरकडे 'गोयार्ड सेंट लुईस' या ब्रँडची एक सुंदर टोट बॅग आहे. जी तिची आवडती बॅग आहे. या टोट बॅगची किंमत 1.5 लाख रुपये आहे.

जान्हवी एकदा 'Moschino SpongeBob' कंपनीची बकेट बॅग प्रिंटेड सूटसोबत घेऊन जाताना दिसली, ज्याची किंमत 65,000 रुपये आहे.

जान्हवी तिचा जिम लूक पूर्ण करण्यासाठी महागड्या बॅग देखील कॅरी करते.

तिच्याकडे 'चॅनल' ब्रँडची निळी आणि गुलाबी रंगाची शोल्डर बॅग देखील आहे. जिची किंमत 3,13,400 रुपये एवढी आहे.

जान्हवीच्या बॅग कलेक्शनमध्ये 'चॅनेल' ब्रँडची विंटेज स्क्वेअर सीसी फ्लॅप बॅग आहे, जी अस्सल लेदरपासून बनलेली आहे. ही पिशवी काळ्या रंगाची आहे. या बॅगची किंमत 2,13,640 रुपये आहे.

जान्हवीच्या आवडत्या हँडबॅगच्या लिस्टमध्ये तिची चेरी रेड हर्मेस बिर्किन बॅग देखील आहे, जी ती अनेकदा प्रवासावेळी सोबत घेऊन जाते. ज्याची किंमत 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत आहे.