बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही अभिनेता सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. सैफचे पहिले लग्न अमृता सिंगसोबत झाले होते. लग्नाच्या तेरा वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला त्यानंतर सैफने करीनासोबत लग्न केले. दोघांना दोन मुलं आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुद्धा घटस्फोटीत व्यक्तीसोबत आपला संसार थाटला आहे. राज कुंद्राने आपल्या पहिली पत्नी कविताला घटस्फोट दिल्यानंतर शिल्पासोबत लग्न केले.