महिलांनो चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी या गोष्टी जाणून घ्या.
अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यात चमचा साखर आणि अर्थ चमचा मक्याचे पीठ घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 30 मीने तसेच ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
विरघळलेल्या साखरेत लिंबाचे काही थेंब टाकून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
व्यवस्थित कुस्करलेल्या केळामध्ये 2 चमचे ओट्स घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
केस येणाऱ्या जागी कापलेल्या लिंबावर मध घेऊन तो चोळल्यास फायदा होऊ शकतो.
चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी डेपिलोटोरिएस नावाचे एक केमिकल उपलब्ध आहे. हे केमिकल वापरताना नमूद केलेले नियम काटेकोरपणे पाळा
ब्लीचिंगनेही चेहऱ्यावरील नको असलेले केस नाहीसे होतात. मात्र हा उपाय तुमच्या त्वचेला सूट होतो का नाही हे तपासून पहा.
चेहऱ्यावर सतत येणाऱ्या केसांवर लेझर ट्रीटमेंट हा एक उपाय आहे.