सध्या आधुनिक लाईफस्टाईलमध्ये सुंदर दिसणे खूप इम्पॉर्टन्ट मानले जाते.
चेहरा सुंदर दिसण्यासाठी हजारो रुपयांचे सौंदर्य प्रसाधने वापरली जातात.
परंतु तरुण तरुणींना बऱ्याचदा पिंपल्सचा सामना करावा लागतो.
हार्मोनल बदल : शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. यामुळे पिंपल्स येतात.
मसालेदार पदार्थ : तिखट, चमचमीत मसालेदार पदार्थांचे, तळलेल्या पदार्थांचे वारंवार सेवन केल्यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात.
संत्री, द्राक्ष या फळांचा आहार घेतल्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल.
चुकीची सौंदर्य प्रसाधने : वेगवेगळी फेअरनेस क्रीम आणि स्टिरॉईड्स असलेली क्रीम चेहऱ्यावर लावली कि पिंपल्स वाढतात. केमिकल्स त्वचेवर सुट न झाल्यामुळे पिंपल्स येतात.
व्यायामाचा अभाव : व्यायामाच्या अभावाने अन्न व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित नसणं हे पिंपल्स येण्याचे कारण असू शकतं.