अनेक मुलींना वाटते की, त्या सर्वांना चांगले ठिक करू शकतात. मात्र, जेव्हा तुम्ही एखाद्याला निवडता आणि त्यांची तुमच्यासोबत राहण्याची इच्छा नसते तेव्हा परिस्थिती बिघडते.
प्रेम छान असते मात्र, काही असे संकेत दिसतात की जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर ते गांभीर्याने घ्या.
लग्नापूर्वी तुमचा जोडीदार असे काही कृत्य करतो की जे तुम्हाला अजीबात आवडत नाही.
जसे की, तुमच्यावर ओरडणे, विनाकारण वाद घालणे, मारहाण करणे तर अशा व्यक्तीसोबत लग्न ही एक मोठी चूक आहे.
तुमचे वय किती आहे हे महत्त्वाचे नाही. तर लग्नासाठी घाई करणे हे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जेव्हा वेळ येईल तेव्हा लग्न नक्की होईल.
महिलांना चांगला सिक्स सेन्स असतो या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुम्हाला काही संकेत मिळत असतील तर ते गांभीर्याने घ्या.
केवळ तुमचा जोडीदार हा श्रीमंत आहे म्हणून त्याच्यासोबत लग्न करू नका. कारण पैसा म्हणजे सर्वकाही असे नसते.
लग्न करायचं आहे म्हणून कोणासोबतही करायचं हे योग्य नाही. जोडीदार हा तुमच्यासाठी योग्य आहे का? त्याच्या आवडी-निवडी तुम्हाला पसंत आहेत का? हे सुद्धा पाहा.