Red Section Separator
शरीरात येणारं पाणी आणि इतर पदार्थांमधील अशुद्ध घटक वेगळे करण्याचं काम किडणी करत असते.
Cream Section Separator
जर हे काम बंद पडलं तर किडणी खराब होते. काही दैनंदिन खराब सवयींमुळे किडणी खराब होऊ शकते.
मिठात सोडियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे रक्तदाब वाढून किडणीवर ताण येण्याची शक्यता निर्माण होते.
सोडियम आणि फॉस्फरस असणारं प्रोसेस्ड फूड किडणीसाठी नुकसानकारक असू शकतं.
कमी पाणी पिण्यामुळे किडणी स्टोन अर्थात मुतखडा होण्याची शक्यता असते.
दररोज किमान सात ते आठ ग्लास पाणी पिण्याची गरज असते.
धूम्रपानाच्या सवयीमुळे आपल्या मूत्रात प्रोटीन येण्याची शक्यता वाढून किडणीवर दबाव येऊ शकतो.
सलग अनेक तास एकाच जागी बसण्याने अंगदुखी सुरू होतेच, शिवाय किडणीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
किडणीचं आरोग्य उत्तम राहावं, कमीत कमी सात ते आठ तास झोप आवश्यक आहे.