बॉलिवूड सेलेब्जची मुलं फिल्म इंडस्ट्रीत येण्याचं प्रमाण मोठं आहे; मात्र त्याला अपवादही आहेत.
अन्य क्षेत्रात करिअर करणाऱ्या स्टारकिड्सबद्दल थोडं जाणून घेऊ या.
जूही चावलाची मुलगी जान्हवी मेहताला वाचण्याचा छंद असून, तिला लेखिका व्हायचं आहे. जूहीने एका इंटरव्ह्यूत ही माहिती दिली होती.
आर. माधवनचा मुलगा वेदान्त स्विमिंग चॅम्पियन आहे. 16व्या वर्षीच तो नॅशनल अॅथलीट बनला. सध्या तो 2026च्या ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे.
अर्जुन कपूरची बहीण अंशुलाने कोलंबिया युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशननंतर अनेक कंपन्यांत काम केलं आहे. सध्या ती फॅनकाइंड वेबसाइटच्या माध्यमातून गरजूंना मदत करते.
अनुराग कश्यपची मुलगी आलिया सध्या अमेरिकेत शिकत असून, ती लाइफस्टाइल ब्लॉगर, डिजिटल क्रिएटर आहे. ती स्वतःचं यू-ट्यूब चॅनेल चालवते.
आलियाला फिल्ममध्ये काम करण्याची इच्छा नाही; मात्र इम्तियाज अलीची मुलगी इदा अलीने दिग्दर्शित केलेल्या 'गायत्री' या शॉर्ट फिल्ममध्ये ती झळकली होती.
इदा अलीला लेखन-दिग्दर्शनात रस आहे. वडिलांप्रमाणेच प्रोड्यूसर व्हायचं असलेल्या इदाने 15व्या वर्षीच 'लिफ्ट' ही शॉर्ट फिल्म लिहून दिग्दर्शित केली होती.
अनन्या पांडेची Cousin अलाना पांडेने 'लंडन कॉलेज ऑफ फॅशन'मधून ग्रॅज्युएशन केलं आहे. ती मॉडेल असून, भावी पतीसोबत एक यू-ट्यूब चॅनेल चालवते.
अमिताभ-जया बच्चन यांची नात नव्या नंदा नवेलीने कॉलेज फ्रेंड्ससह 'आरा हेल्थ' नावाचं ऑनलाइन हेल्थकेअर पोर्टल तयार केलं आहे.
फरहान अख्तरची मोठी मुलगी शाक्या अख्तर डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे. आर्ट आणि फॅशनशी संबंधित कंटेंट ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.