सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे सावट आहे. त्याचबरोबर महागाईचाही दबाव आहे.
परंतु असे असूनही, काही इक्विटी म्युच्युअल फंड सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत
अशा फंडांपैकी एक म्हणजे कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड.हा स्मॉल-कॅप इक्विटी फंड आहे.
गेल्या तीन वर्षांत 40 टक्के CAGR (कम्पाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट) वर नफा कमावला आहे.
हा इक्विटी म्युच्युअल फंड सर्वात कमी खर्चाचे प्रमाण असलेल्या स्मॉल-कॅप फंडांपैकी एक आहे.
व्हॅल्यू रिसर्चने या म्युच्युअल फंडाला 5-स्टार रेटिंग दिले आहे.
या स्मॉल-कॅप इक्विटी म्युच्युअल फंडाने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 16.90 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
म्हणजेच एका वर्षात 1 लाख ते 1.20 लाख रुपये झाले आहेत.
जर तुम्ही एका वर्षापूर्वी या फंडात 10,000 रुपयांची मासिक SIP करायला सुरुवात केली असती, तर आज ही रक्कम 1.31 लाख रुपये झाली असती.
जर एखाद्याने 2 वर्षांपूर्वी कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंडमध्ये 1 लाख रुपये जमा केले असतील, तर ती रक्कम आता जवळपास अडीच पट म्हणजेच 2.40 लाख रुपये झाली असती.