Red Section Separator

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये 'तारक मेहता का उलटा चष्मा’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

Cream Section Separator

एक दशकाहून अधिक काळ ही मालिका प्रेक्षकांचं सातत्यानं मनोरंजन करतेय. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात

या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका काही आठवड्यांपूर्वी सोडली. मालिकेत ते तारक मेहता हे पात्र साकारत होते.

आता मालिकेत त्यांची जागा अभिनेता सचिन श्रॉफ घेणार आहे. मालिकेतील दोन भागांचे चित्रीकरणही त्यानं केलं असल्याची माहिती मिळतेय.

आगामी भागाचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यापूर्वी सचिननं छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

याआधी तो ‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेत दिसला होता. त्यानं वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

‘आश्रम ३’मधील त्यानं साकारलेली हुकूम सिंह ही राजकीय नेत्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.

आता पुन्हा एकदा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात तो कितपत यशस्वी ठरतो; हे येत्या भागांमधून समजेल.