बॉलिवूड कलाकार हे नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असतात. त्यांची लाइफस्टाइल, त्यांचे खासगी आयुष्य, त्यांची व्यवसाय या गोष्टी जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.

आज आपण अशाच काही कलाकारांच्या साइड बिझनेस विषयी जाणून घेऊ

दीपिका पदूकोण : दीपिका पदूकोणचा स्वत:चा कपड्यांचा ब्रँड आहे. ‘द लिव लव्ह लाफ फाऊंडेशन’ हे देखील तिचे आहे.

अनुष्का शर्मा : अभिनेत्री अनुष्का शर्मा भावासोबत ‘क्लीन स्लेट’ नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवते. त्यासोबतच तिचा एक कपड्यांचा ब्रँड देखील आहे.

शिल्पा शेट्टी : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आयपीएलची राजस्थान रॉयल्स ही टीम होती. पण नंतर तिने ती विकली. आता शिल्पाचे एक स्पा आणि सलॉन आहे.

प्रियांका चोप्रा : अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉलिवूडसह हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. तिचे पर्पल पेबल्स पिक्चर्स नावाचे प्रोडक्शन हाउस आहे. तसेच न्यूयॉर्कमध्ये तिने सोना नावाचे एक रेस्टॉरंट सुरु केले आहे.

शाहरुख खान : शाहरुखचे ‘रेड चिलीज’ नावाचे एक प्रोडक्शन हाऊस आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर या आयपीएल टीमचा तो को-ओनर आहे.

अक्षय कुमार : अभिनेता अक्षय कुमार हा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. तो हरिओम एंटरटेनमेंट प्रोडक्शन आणि ग्राजिंग गॉट पिक्चर्सचा मालक आहे. इतर काही ब्रँडसोबतही त्याचा टायअप आहे.

सलमान खान : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे सर्वच चित्रपट हिट ठरतात. त्याचा बिंग ह्यूमन बा ब्रँड लोकप्रिय आहे. त्याचे एक प्रोडक्शन हाउस देखील आहे.

हृतिक रोशन : अभिनेता हृतिक रोशन एक जीमचा मालक आहे. त्यासोबतच त्याचा कपड्यांचा एचआरएक्स ब्रँड देखील लोकप्रिय आहे.

अजय देवगण : अभिनेता अजय देवगणचे अनेक साइड बिझनेस आहेत. त्याचे अजय देवगण फिल्म नावाचे एक प्रोडक्शन हाउस आहे.