Red Section Separator

आज सोन्याच्या दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात मात्र घसरण झाली आहे.

Cream Section Separator

गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपयांवर पोहोचला आहे.

Red Section Separator

सोमवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,150 रुपये इतका होता.

म्हणजेच आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 600 रुपयांची वाढ झाली आहे.

Red Section Separator

आज 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 52,090 इतका असून, सोमवारी 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,430 रुपये इतका होता.

आज 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 660 रुपयांची वाढ झाली आहे.

दुसरीकडे मात्र आज चांदीचे दर घसरले आहेत, आज चांदीचे दर प्रति किलो 61,300 रुपये आहेत.

Red Section Separator

सोमवारी चांदीचे दर प्रति किलो 62,100 रुपये इतके होते.

आज चांदीच्या दरात प्रति किलो मागे 800 रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होत असल्याने, अनेकदा भावामध्ये तफावत आढळून येते.