राधे श्याम : पूजा हेगडे आणि प्रभास असलेल्या राधे श्यामचा बजेट ३०० कोटी रुपयांचा होता. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फक्त दीडशे कोटी रुपयांचा गल्ला कमावला.
वल्लीमै : साउथ सुपरस्टार अजीत कुमार आणि हुमा कुरैशी यांचा वल्लीमै चित्रपटाचा बजेट दीडशे कोटी रुपये होता. फेब्रुवारीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने फक्त ११९ कोटी रुपये कमावले.
बीस्ट : विजय थलपतीच्या बीस्ट चित्रपटाचा बजेट १५० कोटी रुपये इतका होता, परंतु हा चित्रपट प्रेक्षकांना फार पसंत नाही पडला आणि या चित्रपटाने फक्त १६९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
आचार्या : रामचरण आणि त्याचे वडील चिरंजीवी यांचा आचार्या हाच चित्रपट १४० कोटी रुपये बजेटचा होता, परंतु आरआरआरमुळे या चित्रपटाने फक्त ७० कोटी रुपयांचा गल्ला कमावला.
कोचादैयां : सुपरस्टार रजनीकांतचा Kochadaiiyaan चा बजेट १२५ कोटी रुपये होता, परंतु हा चित्रपट दणकून आपटला आणि केवळ ४२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
विक्रांत रोणा : किच्चा सुदीप आणि जॅकलीन फर्नांडिस असलेल्या या चित्रपटाचा बजेट ९५ कोटी रुपये इतका होता परंतु हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला नाही आणि केवळ ७८ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले.
लिंगा : सुपरस्टार रजनीकांतचा लिंगा हा बॉक्स ऑफिसवर आपटला होता, त्यानंतर रजनीकांतला डिस्ट्रिब्युटर्संना पैसेही द्यावे लागले होते.
लाइगर : विजय देवरकोंडाचा मोस्ट अवेटेड असलेल्या या चित्रपटाचा बजेट १२५ कोटी रुपयांच्या घरात होता, परंतु हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला.