अति महत्वाच्या व्यक्तींसाठी काही खास कार बनवण्यात येतात.
या कार एवढ्या अभेद्य असतात कि बॉम्ब देखील याला इजा पोहचवू शकत नाही.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या कार आहेत.
मोदींच्या ताफ्यात जगातील सर्वात सुरक्षित कार्सपैकी एक मर्सिडीज मेबॅक एस ६५९ गार्ड ही कार आहे.
जो बायडेन यांच्याकडे जगातली सर्वात सुरक्षित कार ‘द बीस्ट’ आहे.
चीनचे शी जिनपिंग यांच्याकडे चिनी कंपनी हांग्कीची एन ५०१ ही कार आहे.
रशियाचे पुतीन यांच्याकडे ऑरस सिनाट ही कार आहे. ही कार केमिकल हल्ला, बॉम्ब हल्ला याला तोंड देऊ शकते.
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे बेंटले स्टेट लिमोझिन हि कार आहे.