Red Section Separator

बॉलिवूडचा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे. चित्रपटांमुळे फॅशनपासून नवनवीन ट्रेंड समोर येतात.

Cream Section Separator

इतकंच नाही तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ज्या ठिकाणी शूटिंग केलं जातं, ती ठिकाणं पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होतात.

पर्यटकांमध्ये त्या ठिकाणाची ओळख त्या चित्रपटातून निर्माण होते. या यादीत शाहरुख खानपासून ते आमिर खानपर्यंतच्या चित्रपटांचा समावेश आहे.

'दिल चाहता है'चे शूटिंग गोव्यातील अगडा किल्ल्यावर झाले. चित्रपटाचे शूटिंग ज्या ठिकाणी झाले ते आता चित्रपटाच्या नावावरूनच ओळखले जाते.

'जब वी मेट'मधील 'गीत'चा प्रवास मुंबईपासून सुरू होतो आणि पंजाब, शिमला, मनाली आणि रोहतांग पासमधून जातो.

रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटानंतर चेन्नईत पर्यटकांची संख्या वाढली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण होती.

'3 इडियट्स'मधला लडाखचा सीन कोण विसरू शकेल जिथे करीना कपूर वधूच्या पोशाखात स्कूटरवर येते. विशेषत: '3 इडियट्स'मुळे लोक त्या ठिकाणी भेट देतात.

'जोधा अकबर' चित्रपटाच्या शूटिंगचा मोठा भाग जयपूरच्या आमेर फोर्टमध्ये झाला आहे. जेथे भव्य वैभव आजही दिसते.

'रंग दे बसंती' नंतर नजफगड किल्ल्याला पर्यटन स्थळ म्हणून नवी ओळख मिळाली.

उटी हे चित्रपट निर्मात्यांचे आवडते ठिकाण आहे. 'साजन', 'राज' आणि 'गोलमाल अगेन'चे शूटिंग येथे झाले आहे.