Red Section Separator
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणजे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर.
Cream Section Separator
छत्रपती शाहू महाराजांनी महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिमेला बांधलेला रंकाळा तलाव म्हणजे रम्य ठिकाण.
न्यू पॅलेस ही 18व्या शतकातली वास्तू असून, तिथे शाहू महाराजांच्या काळातल्या वस्तू पाहता येतात.
शाहू महाराजांच्या काळातला महालाचा भाग असलेला कोल्हापुरातला भवानी मंडपही इतिहासाचा साक्षीदार आहे.
कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरच्या नरसोबाच्या वाडीत पुरातन दत्तमंदिरात जाणं म्हणजे नितांत सुंदर अनुभव.
दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोतिबाचं मंदिर वाडी रत्नागिरीमध्ये उंच डोंगरावर आहे.
कोल्हापूरच्या ग्रामीण, ऐतिहासिक जीवनाची झलक कण्हेरी मठातल्या सिद्धगिरी Wax Museumमध्ये दिसते.
शिवरायांसह अनेक मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा पन्हाळा किल्ला कोल्हापूर भेटीत पाहायलाच हवा.
खिद्रापूरचं शिलाहार राजवटीतलं कोपेश्वर मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा थक्क करून टाकणारा नमुना आहे.
दाजीपूर-राधानगरी Wildlife Sanctuary गवारेड्यांसाठी प्रसिद्ध आहे.