Red Section Separator

गगनबावडा येथील दाट धुक्यात कोसळणारा पाऊस, करूळ व भुईबावडा घाटातून होणारे वर्षा ऋतूचे विलोभनीय दृश्य सर्वांनाच मोहीत करते.

Cream Section Separator

पाऊस अंगावर झेलत तरुणाई चिंब भिजत आनंद द्विगुणीत करतानाचे चित्र गगनबावड्यात पाहावयास मिळत आहे.

शहर व जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर कमी असला तरी कोकण घाटमाथ्यावरचा करूळ व भुईबावडा घाट, गगनबावडा परिसरात चांगला पाऊस सुरू आहे.

एरवी मुसळधार पावसात त्याचा आनंद घेण्यासाठी गाडीतून खाली उतरणे अशक्य होते.

आता पावसाचा जोर थोडा कमी असल्याने पर्यटकांना पावसाचा मनसोक्त आनंद घेता आला

गगनगड, करूळ, भुईबावडा घाटातून वाहणारे झुळझुळ झरे व कड्यावरून स्वच्छंदपणे कोसळणारे पांढरे शुभ्र लहान-मोठे धबधबे पर्यटकांचे मन मोहून टाकत आहेत.

हिरवागार शालू परिधान केल्याचा भास निर्माण करणाऱ्या घाटातील टेकड्या पर्यटकांना भुरळ घालत आहेत.