Red Section Separator

दुचाकी क्षेत्रात आघाडीवर असलेली TVS कंपनीने आजवर अनेक आकर्षक व दमदार बाईक्स लॉन्च केल्या आहेत.

Cream Section Separator

दुचाकी प्रेमींसाठी कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत नवीन बाईक लॉन्च करणार आहे.

स्पोर्ट सेगमेंटमधील TVS Zeppelin R ही नवीन क्रूझर बाईक असेल, जी लवकरच लॉन्च केली जाईल.

Zeppelin R चे कॉन्सेप्ट मॉडेल 2018 ऑटो एक्सपोमध्ये शोकेस करण्यात आले होते.

कंपनी TVS Zeppelin R मध्ये 220cc सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन देऊ शकते. हे इंजिन सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.

या आगामी बाईकमध्ये तुम्हाला 48 व्होल्ट लिथियम आयन बॅटरी पाहायला मिळेल. याचे इंजिन 20bhp पॉवर आणि 18.5Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

यात 5 स्पीड गिअरबॉक्स मिळेल. तर एलईडी हेडलॅम्प, स्प्लिट सीट, फ्लॅट ट्रॅक स्टाईल हँडलबार, 17-इंच फ्रंट आणि 15-इंच मागील चाक मिळेल.

Red Section Separator

टीव्हीएसच्या या आगामी बाईकमध्ये कॉम्पॅक्ट इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्ट बायो की, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, यूएसजी फ्रंट फोर्क्स आणि मोनोशॉक युनिट, फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स यासह अनेक फीचर्स मिळू शकतात.

Red Section Separator

ही बाईक भारतीय बाजारपेठेत 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या टॅगसह सादर केली जाऊ शकते.

Red Section Separator

कंपनी आपली ही नवीन बाईक भारतात कधी लॉन्च करणार, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही आहे.