Red Section Separator

तब्बूने वयाची पन्नाशी पार केली असली, तरी अद्याप आपल्याला मनासारखा जोडीदार मिळाला नसल्याचं तिचं म्हणणं आहे.

Cream Section Separator

'कहो ना प्यार है' या पहिल्याच सिनेमातून लोकप्रियता मिळवलेल्या अमिषा पटेलला खऱ्या आयुष्यात साजेसा साथीदार मिळालेला नाही.

मिस युनिव्हर्स, अभिनेत्री सुष्मिता सेन 2 दत्तक मुलींची आई असली, तरी 46व्या वर्षीही अविवाहित आहे. रोहमन शॉलसोबत तिचं ब्रेकअप झालं.

आयुष्यभर साथ करायला आवडेल असं कोणी मिळालं नाही, असं साक्षी तन्वर म्हणते. तिची पन्नाशी उलटून गेली आहे.

47 वर्षांच्या नगमाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवली. बॉलिवूडमध्येही ती झळकली. अनेकांबरोबर तिचं नाव जोडलं गेलं; मात्र ती सिंगलच आहे.

45 वर्षं उलटून गेली, तरी अद्याप लग्नाचा विचार केलेला नाही, असं दिव्या दत्ता सांगते.

एक काळ गाजवलेल्या आशा पारेख यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. नासिर हुसेन यांच्याशी त्यांचं नाव जोडलं गेलं; मात्र विवाह झाला नाही.

नर्गिस फाखरीदेखील 40+ असून, तिचं लग्न झालेलं नाही. उदय चोप्रा, मॅट अलोंझो, जस्टिन सँटोस यांच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती.