Red Section Separator

सणासुदीचा हंगाम सुरू होणार असून, या महिन्याच्या अखेरीस अनेक गाड्या बाजारात लॉन्च होणार आहे.

Cream Section Separator

मारुती सुझुकीची ग्रँड विटारा, टाटा टियागो इलेक्ट्रिक हॅचबॅक आणि टोयोटाची फ्लेक्स-फ्यूल कॅमरी या तीन गाड्या लॉन्च केल्या जातील.

आज आम्ही तुमच्यासाठी या तीन वाहनांशी संबंधित माहिती घेऊन आलो आहोत.

Maruti Grand Vitara : नवीन मारुती ग्रँड विटाराच्या किमती सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केल्या जाणार आहेत.

ग्रँड विटारा 6 ट्रिममध्ये उपलब्ध आहे – सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा+ आणि अल्फा+. ही देशातील सर्वात मजबूत हायब्रीड कार असेल.

Tata Tiago EV : Tata Motors 28 सप्टेंबर रोजी देशात तिसरी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. त्याची अंदाजे किंमत 10 लाखांपर्यंत असू शकते.

ही भारतातील सर्वात स्वस्त ईव्ही बनणार आहे. कंपनी याला तीन राइडिंग मोडमध्ये ऑफर करेल. त्याची बहुतेक फीचर्स आणि डिझाइन घटक स्टँडर्ड Tiago सारखेच असतील.

Toyota flex-fuel Camry : टोयोटाच्या फ्लेक्स-इंधन कारचे 28 सप्टेंबर 2022 रोजी अनावरण केले जाईल. ही टोयोटाची Camry flex-fuel sedan असेल.