मारुती सुझुकी नवीन वाहनांसह बाजारपेठेतील हिस्सा पुन्हा मिळवण्यासाठी सज्ज आहे.
कंपनीने नुकतीच आपली ग्रँड विटारा मिड-साइजची एसयूव्ही सादर केली, जी टोयोटासोबत सह-विकसित करण्यात आली आहे.
आता कंपनी 2023 च्या सुरुवातीला दोन SUV मारुती बलेनो क्रॉस आणि जिमनी 5-डोर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
याशिवाय कंपनी मारुतीच्या अत्यंत लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्टच्या (Swift) नेक्स्ट जनरेशन मॉडेलवरही काम करत आहे.
ही तीन वाहने 2023 च्या दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाण्याची शक्यता आहे.
Maruti Baleno Compact SUV : ही कंपनीची भारतातील पुढील मोठी लाँच असेल. BS6 बूस्टरजेट टर्बो पेट्रोल इंजिनसह येण्याची अपेक्षा आहे.
Maruti Suzuki 5-Door Jimny : मारुती भारतात सुझुकी जिमनीची 5-डोर एडिशन आणणार आहे. त्याची लांबी सुमारे 3850 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 210 मिमी असणे अपेक्षित आहे.
suzuki swift hatchback : सुझुकी स्विफ्ट हॅचबॅकचे नवीन मॉडेल २०२३ दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये भारतात अनावरण केले जाण्याची शक्यता आहे