Red Section Separator

बुलेट बाइक म्हटलं, की डोळ्यांसमोर चित्र येतं ते ती चालवणाऱ्या पुरुषाचंच;

Cream Section Separator

पण मुंबईची डिंपल सिंग त्याला अपवाद आहे.

स्पिती व्हॅली आणि सचपास या खडतर बर्फाळ प्रदेशांचा प्रवास एकाच राइडमध्ये करणारी ती देशातली Youngest मुलगी आहे.

2019 साली तिने 500 CC रॉयल एन्फिल्ड बुलेटवरून 14 दिवसांत हा प्रवास केला. त्यांच्या 10 जणांच्या ग्रुपमध्ये 2 मुली होत्या.

हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर India Book of Records मध्ये तिच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली.

वडिलांकडे बुलेट असल्याने ती चालवण्याचं स्वप्न तिने लहानपणापासून पाहिलं होतं; मात्र संधी मिळाली नव्हती.

कॉलेजमध्ये ती व्हॉलिबॉलपटू झाली. 9 वेळा नॅशनल लेव्हलला राज्याचं प्रतिनिधित्व तिने केलं. 4 वेळा ती कॅप्टनही होती.