Red Section Separator

कोरोना काळात प्रेक्षकांचा कल OTT कडे वाढला असल्याचे दिसून आले. तसेच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक नवनवीन वेब सीरिज ओटीटीवर रिलीज झाल्या.

Cream Section Separator

आज आपण अशाच काही वेब सीरिज बाबत जाणून घेऊ ज्यांचे बजेट बॉलिवूडमधील चित्रपटांनापेक्षा देखील अधिक होते.

मेड इन हेवन : २०१९ मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज झालेल्या या वेब सीरिजचे बजेट १०० कोटी रुपये इतकं होतं.

सेक्रेड गेम्स : नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ वेब सीरिजने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. या वेब सीरिजचे बजेटदेखील १०० कोटी रुपये इतकं होतं.

मिर्झापूर : ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचे तीन सीझन प्रदर्शित करण्यात आले आहेत. ७० कोटी रुपये इतके ‘मिर्झापूर’ चे बजेट होते.

बार्ड ऑफ ब्लड : ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली होती. या वेब सीरिजचे बजेट ६० कोटी रुपये इतकं होतं.

इनसाइड एज : अ‍ॅमेझॉन प्राइमवरील ‘इनसाइड एज’ ही वेब सीरिज क्रिकेटवर आधारित आहे.  या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनचं बजेट ५० कोटी रुपये होतं.

Red Section Separator

ब्रीथ : ‘ब्रीथ’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. २५ कोटी रुपये इतकं या वेब सीरिजचं बजेट होतं.

Red Section Separator

द फॅमिली मॅन : अ‍ॅमेझॉन प्राइमवरील सर्वाधिक चर्चेत राहिलेली वेब सीरिज म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. या वेब सीरिजचे बजेट ३० कोटी रुपये इतकं होतं.

Red Section Separator

पाताललोक : ओटीटीवर सुपरहिट ठरलेल्या वेब सीरिजपैकी एक म्हणजे ‘पाताललोक’.या वेब सीरिजचे बजेट २५ कोटी रुपये इतकं होतं.