Red Section Separator
संत्रा कलमांची लागवड पावसाळा सुरू होताना करणे उत्तम असते.
Cream Section Separator
पावसाळा संपताना किंवा संपून गेल्यानंतर लागवड करणे टाळावे.
लागवड करताना कोणती काळजी घ्यावयाची याबाबत जाणून घ्या
कलमा लागवडीपूर्वी सावलीत ठेवाव्यात. पॅकिंगच्या मुळाचा भाग थोडा वेळ पाण्यात बुडवून काढावा किंवा त्यावर पाणी शिंपडावे.
कलम जमिनीत लावण्यापूर्वी त्यांची मुळे ३ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लावावीत.
कलमा लागवडीपूर्वी खड्डे शेणखत अधिक माती (२:१) आणि २ किलो सिंगल सुपर फॉस्फेटने भरून ठेवलेले असावेत. कलमे खड्ड्याच्या मध्यभागी जमिनीत लावावीत.
कलम लावताना मुळे स्वाभाविक अवस्थेमध्ये ठेवावीत. नंतर मुळांचा मातीबरोबर घनिष्ठ संबंध यावा, यासाठी माती घट्ट दाबावी.
लागवडीच्या वेळी कलमे एका ओळीत येण्यासाठी झाडे लावण्याचा तक्त्याचा वापर करावा. लागवड शक्यतो रिमझिम पाऊस सुरू असताना करावी.
लागवड पूर्ण झाल्यानंतर पाऊस न आल्यास लगेच पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वाफसा आल्यावर प्रत्येक कलमाच्या चहूबाजूंनी माती घट्ट दाबून घ्यावी.
कलमांचे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. पाऊस नसल्यास दर तीन दिवसांनी कलमांना पाणी द्यावे.
कलमांना नवीन जोमदार फुटवे आल्यावरच रासायनिक खतांची मात्रा द्यावी.