आजकाल गृह कर्ज, वाहन कर्ज यासह वैयक्तिक बाबींसाठीही बँकेकडून कर्ज मिळते. मात्र यासाठी सिबिल स्कोर अत्यंत महत्वाचा असतो.
तर CIBIL स्कोर काय आहे, त्याचे महत्त्व आणि तुम्ही चांगला स्कोअर कसा राखू शकता ते जाणून घेऊया.
सिबिल स्कोअरची रेंज 300 ते 900 पर्यंत असते. CIBIL स्कोर ही तीन अंकी संख्या आहे. तुमचा स्कोर जितका जास्त असेल तितका चांगला.
साधारणपणे, 750 वरील स्कोअर चांगला मानला जातो आणि त्यात कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते.
कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणे अत्यावश्यक आहे. हा सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी काही बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे.
चांगला CIBIL स्कोअर राखायचा असेल, तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परतफेडीबाबत कठोर असणे - वेळेत पैसे द्या आणि कधीही उशीर करू नका.
तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये क्रेडिट कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करत असाल तर ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत काहीतरी त्रुटी आहेत, असा समज होऊ शकतो.
क्रेडिट कार्डाची लिमीट वाढवणे हे युटिलायझेशन रेट वाढवण्याच्यादृष्टीने चांगले ठरते. मात्र, तुम्ही क्रेडिट लिमीट कमी केलीत तर हा रेटही घटतो.