Red Section Separator

निखिल सिद्धार्थ सध्या खूप चर्चेत आहे. 'कार्तिकेय 2' या चित्रपटाने तो आता संपूर्ण भारताचा स्टार बनला आहे.

Cream Section Separator

1 जून 1985 रोजी हैदराबादजवळील बेगमपेटमध्ये जन्मलेला निखिल 2007 पूर्वी तेलुगू चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करत असे. पण नंतर नशीब बदलले.

हॅप्पी डेज या चित्रपटात निखिलने चार प्रमुख कलाकारांपैकी एकाची भूमिका केली होती.

त्यानंतर तो चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता बनू लागला. 2014 मध्ये 'कार्तिकेय'ने त्याला सुपरस्टार बनवले.

2003 मध्ये आलेल्या 'सांबरम' चित्रपटात तो कार ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसला होता.

2006 मध्ये निखिल 'हैदराबाद नवाब' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सामील झाला.

2007 मध्ये 'हॅपी डेज' या चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली.

अभिनेता म्हणून 'हॅपी डेज'साठी निखिलची फी तेव्हा 25 हजार रुपये होती. त्याचा पहिला सोलो लीड हिरो चित्रपट 'अंकित, पल्लवी अँड फ्रेंड्स' 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता.

'कार्तिकेय 2' हा निखिल सिद्धार्थच्या करिअरमधील 19 वा चित्रपट आहे. एवढेच नाही तर जगभरात १०० कोटींचा व्यवसाय करणारा त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे.

निखिलचे लग्न झाले आहे. त्याने 2020 मध्ये पल्लवी वर्माशी लग्न केले.