Red Section Separator

दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो.

Cream Section Separator

रक्तदान हे केवळ रक्त घेणाऱ्यांसाठीच फायदेशीर नाही तर रक्तदात्यासाठीही ते फायदेशीर आहे.

या दिनाचे औचित्य साधून आज आपण रक्तदानाचे फायदे जाणून घेऊ

वजन कमी करण्यात उपयुक्त : रक्तदान करून, तुम्ही तुमचे वजन अगदी सहज नियंत्रणात ठेवू शकता.

एकदा रक्तदान करून तुम्ही 650 ते 700 कॅलरीज कमी करू शकता. कॅलरीज कमी झाल्या की वजनही कमी होते.

हृदय निरोगी ठेवते : नियमितपणे रक्तदान करत राहिल्यास रक्तामध्ये जास्त प्रमाणात लोह जमा होत नाही, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

कर्करोगाचा धोका कमी असतो : नियमित रक्तदान केल्याने यकृतातील लोहाचे प्रमाण नियंत्रित राहते, जे यकृत आणि स्वादुपिंडाचा कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त ठरते.

Red Section Separator

नवीन रक्तपेशींची निर्मिती : रक्तदान केल्यानंतर लाल रक्तपेशी शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी नवीन पेशी तयार करतात. यामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळते आणि तुम्हाला आतून चांगले वाटते.

Red Section Separator

शरीर तंदुरुस्त ठेवते : नियमित रक्तदान केल्याने शरीरातील घाण बाहेर पडत राहते, त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका टळतो.