Red Section Separator
भविष्यासाठी गुंतवणूक म्हंटले कि तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवणूक करू शकता.
Cream Section Separator
याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा आहे. मात्र PPF मध्ये 7 वर्षांनी आंशिक पैसे काढू शकता.
PPF मधून पैसे काढण्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या
बँकेच्या वेबसाइटवर जाऊन पीपीएफ काढण्याचा फॉर्म डाउनलोड करू शकता.
हा फॉर्म सी. बँकेच्या शाखेतूनही फॉर्म घेता येईल. फॉर्म सी मध्ये तीन भाग असतात.
पहिला भाग म्हणजे घोषणा, ज्यामध्ये तुम्हाला पीपीएफ खाते क्रमांक आणि काढायची रक्कम टाकावी लागेल.
तुम्ही अल्पवयीन व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढत असाल तर त्याचे नाव देखील टाकावे लागेल.
फॉर्मच्या दुसऱ्या भागात, बँक पीपीएफ खाते उघडण्याची तारीख, एकूण रक्कम, पैसे काढण्याची तारीख, उपलब्ध रक्कम, मंजूर रक्कम त्यानंतर सही करावी लागेल.
फॉर्ममध्ये रेव्हेन्यू स्टॅम्प चिकटवावा लागतो आणि त्यावर स्वाक्षरी करावी लागते.
यामध्ये तुम्हाला तुमचे पीपीएफ पासबुक द्यावे लागेल. मंजूर रक्कम थेट तुमच्या बचत खात्यात जमा केली जाते.