Room Heater : हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण हीटर खरेदी करतात. जर तुम्ही या हिवाळ्यात एक सर्वोत्तम क्वालिटीचा हीटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

कारण मागणीमुळे हिटरच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. तरीही बाजारात असे काही हिटर आहेत ते तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. विशेष म्हणजे हे हिटर कडाक्याच्या थंडीत मिनिटांत तुमची रूम गरम करतात.

हे खूप स्वस्त आहेत आणि तुम्ही ते अगदी परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता. विशेष म्हणजे या हीटर्सचे फीचर्स खूप चांगले आहेत आणि तुम्ही ते ऑनलाइनही खरेदी करू शकता.

Knyuc रूम हीटर :

हे हीटर तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. त्याची किंमत 1199 रुपये आहे. यावर तुम्हाला 50% सूट मिळेल. त्यानंतर तुम्ही ते Rs.599 मध्ये खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला 2 गियर स्पीड मिळेल. हे वजनाने खूप हलके आहे, त्यामुळे तुम्ही ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता.

बजाज ब्लो हॉट रूम हीटर :

त्याची किंमत थोडी जास्त आहे. पण यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक थर्मल कट आऊट मिळतो. हा हीटर 1000W आणि 2000W च्या दोन हीट सेटिंगसह बाजारात दाखल झाला आहे. तुम्ही हे फक्त 1899 मध्ये खरेदी करू शकता. त्याची एमआरपी रु.2399 आहे.