अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :-दिपावली हा सण आनंदाबरोबर सुख समाधान आणि सकारात्मकतेची भरभराट करणारा आहे. दिपावलीत नवं स्वप्नाला नवं ऊर्जा मिळत असते. अंगणातील दिव्यांच्या प्रकाशाने मनातील निराशेचा अंधकार दूर होतो.
वसुबारसपासून दिवाळीची लगबग सुरु होते, छोट्या मोठ्या अनेक गोष्टींचे नियोजन करावे लागते. दुस-या दिवशी धनत्रयोदशीलाही प्रत्येकांची पुजेसाठी मनात प्रसन्नता असते.
दिपावलीची ती पहाट मनाला नवं स्वप्न देत असते. उटण्याचा सुगंध, सुवासिक तेलाचं मालिश, अभ्यंग स्नानाचा थाट पार पडल्यानंतर कुटुंबासह खमंग फराळाचा आस्वाद घेण्याचा आनंद प्रत्येकालाच हवा हवासा वाटतो. दिपावलीत माता महालक्ष्मीचा कृपाआशीर्वाद सदैव सोबत राहावा.
म्हणुन दिपावलीच्या दिवशी लक्ष्मीपुजनाचे महत्त्व आहे. महालक्ष्मीस “समृद्धी” “आनंद”, “वैभव” असे म्हटले जाते, तसेच माधवी, रमा, कमला, ही सुद्धा श्री महालक्ष्मीची रूपे आहेत.
श्रीलक्ष्मी म्हणजे धनधान्य समृद्धीची देवता. तिच्या परिवारामध्ये अदिति-निर्ऋति. पृथिवी,शची,राका,सिनीवाली, कुहू, सरमा यांचा समावेश होताना आपणास दिसुन येतो. तिच्या कृपेने भक्तानां वनसंपदेचे बरोबर आरोग्याचे ऐश्वर्य प्राप्त होते..!!
लक्ष्मीपूजन हे मोठ्या आनंदात व उत्साहाने करतात. लक्ष्मी पूजन करण्यामागे, घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य व आरोग्य सतत नांदत राहो व अज्ञानाचा नाश होऊ अशी देवीला प्रार्थना करतात.
लक्ष्मीपूजन दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी करत असतात. यामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते मग घरासमोर सुशोभीत रांगोळी काढून दारी झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते.फराळाला लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवला जातो अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जात असते.
लक्ष्मीपूजनाचा हा दिवस हे हिंदू धर्मातील स्त्रिया मोठ्या आनंदाने व उत्साहाने आणि श्रदधेने साजरा करत असतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे लावून सर्व स्त्रिया मुले आनंदी आनंद असतात व त्या दिवशी दिपोत्सव साजरा केला जातो व लक्ष्मीचे पूजन करतात.
एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून किंवा गुलाब व झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या ठेवून अक्षदांचे स्वस्तिक काढतात. यात श्री लक्ष्मी व धनाचे दैवत श्री कुबेर ह्यांच्या मूर्तीचे मनोभावाने पूजन करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे. म्हणुन त्याच्या प्रसन्नेसाठी सर्व प्रयत्नशील असतात. हिंदुधर्माशास्त्रानुसार श्रीयंत्र हे आपण सर्व यंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ यंत्र म्हणुन ओळखतो.
श्रीयंत्र म्हणजे साक्षात श्रीमहालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. श्री महालक्ष्मीची कृपा आशिर्वादासाठी तीची भक्तीभावखने पुजा करतात. या महखलक्ष्मीस अभिषेकलक्ष्मी अथवा गजलक्ष्मी असे म्हणतात. लक्ष्मी,ऐरावत म्हणजेच हत्ती हे संपत्ती,आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले गेले आहेत. म्हणुन बऱ्याच ठिकाणी यांचीही पुजा केली जाते.
दिपावलीचा ती अश्र्विन अमावस्येचा तो दिवस देवी श्रीमहालक्ष्मीची पुजन करण्यास एक मुहूर्तांपैकी एक असतो. देवीच्या कृपा आशिर्वादासाठी खालील प्रार्थना करतात. ॐ असतो माँ सद्गगमय। तमसो माँ ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृत गमय ॥ ॐ शांती शांती शांती ॥-बृहदारण्यक उपनिषद ॐ आम्हाला असत्य पासून सत्याकडे घेऊन जाते.
अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन जाते. ॐ शांती शांती शांती.-बृहदारण्यक उपनिषद् भारतीय संस्कृतीचा वारसा जतन व्हावा. श्रीम लक्ष्मीदेवाचा सुख, शांती समाधान भरभराट आणि उत्तम आरोग्य लाभावे म्हणून दिपावलीच्या दिवशी लक्ष्मीपुजनाला अतिशय महत्त्व आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम